Wednesday, November 9, 2011

जाण रे जाण तू या त्रिपुरारीला....

 
|| हरी ओम ||

श्रद्धावानानो "श्री अनिरुद्ध पौर्णिमा" उत्सवात सहभागी होवून श्रद्धावानांसाठी नित्य प्रवाहित होणाऱ्या व श्रद्धावानांना शुद्ध करणाऱ्या श्री अनिरुद्धांच्या प्रेमरूपी तीर्थगंगेत न्हाउया व अनिरुद्ध कृपा प्राप्त करूया.

"श्री अनिरुद्ध पौर्णिमा "
शनीवार  दिनांक. : १२ नोव्हेंबर २०११ "श्री हरीगुरूग्राम" वांद्रे (पु.) मुंबई.

"जाण रे जाण तू या त्रिपुरारीला,  
दाता अनिरुद्ध गायत्री नंदन आला."


सद्गुरू श्री अनिरुद्धांचा आधार जाने म्हणजेच मानव जन्माचे सार्थक करणे अर्थात "जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस" कारण....
१) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला श्री गायत्री मातेने अनिरुद्धाना नवअंकुर  ऐश्वर्याने सिद्ध करून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी भूलोकी पाठवले आहे.

२) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला अनिरुद्धांची आजी श्रेष्ठ विठ्ठलभक्त शकुंतला पंडित ह्यांनी बाल अनिरुद्धाना वयाच्या आठव्या वर्षी मुंबई वडाळा येथील विठ्ठल मंदिरात नेले व आजपासून ह्याला "बापू" म्हणायचे असे सर्वाना सांगून अनिरुद्धांचे "बापू" हे नामकरण केले.

३) ह्याच त्रिपुरारी पौर्णिमेला परमात्म्याने शिव स्वरुपात त्रिपुरासुराचा वाढ केला म्हणून तिला 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणतात. तर त्रिपुरारी पौर्णिमेला अनिरुद्ध दत्तगुरू व गायत्री मातेच्या आज्ञेने भूलोकी आले म्हणून श्रद्धावान कार्तिक महिन्याच्या ह्या पौर्णिमेला "अनिरुद्ध पौर्णिमा"  म्हणतात.

१) श्री अनिरुद्ध पौर्णिमेला श्रद्धावान हरिहर स्वरूप असलेल्या त्रिविक्रमाचे तुलसी व बेल वाहून पूजन का करतात?
अनिरुद्ध पौर्णिमेला अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेला हरी व हर एकमेकांना समानपणे भेटतात. जो हरिहर अनिरुद्ध आहे तोच हरिहर स्वरूप त्रिविक्रम आहे म्हणून हरिहर स्वरूप असलेल्या त्रिविक्रमाचे श्रद्धावान तुलसी व बेल वाहून पूजन करतात.

२) सद्गुरू श्री अनिरुद्धांचे 'अनिरुद्ध' हे नाम कोणी ठेवले?
श्री गोपीनाथशास्त्री जगन्नाथशास्त्री पाध्ये हे श्री अनिरुद्धांचे मानवी गुरु हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. सर्व वेद व शास्त्रांत ते अत्यंत पारंगत व विद्वान म्हणून त्याकाळी ते प्रसिद्ध होते. त्यांना श्री विठ्ठल परमात्म्याने व श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या अनुभूतीप्रमाणे त्यांच्या नातीच्या उदरी 'त्रिपुरारी पौर्णिमेला' "तो" येणार ह्याची त्यांना खात्री झाली होती.
गोपीनाथ शास्त्रींची कन्या मालती पाध्ये तीच विवाहानंतरची शकुंतला पंडित. तिची कन्या अरुंधती तीच गोपीनाथ शास्त्रींची नात व लग्नानंतरची सौ. अरुंधती धैर्यधर जोशी.
श्री स्वामी समर्थांनी शकुंतला पंडित यांचे पती नरेंद्रनाथ पंडित यांना दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अरुंधतीच्या पोटी त्रिपुरारी पौर्णिमेला 'दिव्य नील तेज' अवतीर्ण झाल तोच तो 'अनिरुद्ध' जन्मदिवस त्रिपुरारी पोर्णिमा १८ नोव्हेंबर १९५६.
त्या अनिरुद्धांचे "अनिरुद्ध" हे नामम १६ वर्षे आधीच श्री गोपीनाथ शास्त्रींच्या इच्चेप्रमाणे शकुंतला पंडित (अनिरुद्धांच्या आईच्या आई) व द्वारकामाई (गोपीनाथ शास्त्रींची पत्नी) यांनी अरुंधती पुत्राचे नाम 'अनिरुद्ध' असे ठेवले.
हाच तो श्रद्धावानांच्या जीवनात श्रद्धावानांच्या दुष्प्रारब्धनाशासाठी अवतरीत झालेला श्रद्धावानांचा सेनापती, महायोद्ध, व लाडका सद्गुरू...
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू....

३) सद्गुरू श्री अनिरुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला का अवतीर्ण झाले आहेत?

कारण असे आहे कि 'श्री अनिरुद्ध चालीसा' मध्ये अनिरुद्धांचे संकीर्तन करताना
"कार्तिक मास कि पुरण मासी, प्रगत भरे जय जय त्रिपुरारी" असे संकीर्तन केले आहे. त्या कार्तिक पौर्णिमेचे महत्व काय? 
कार्तिक पौर्णिमेला असर्व पूर्णत्व असते म्हणून प्रत्येक श्रद्धावानासाठी सद्गुरुतात्वाचे गुरुतेज जशाच्या तशा स्वरुपात स्वीकारण्याची संधी सहजपणे उपलब्ध होते. जशी उर्जा आहे तशी उर्जा या दिवशी मूळ रुपात प्राप्त होते. राधा तवाचे प्रेम मूळ तत्वाशी प्रगत होते ते याच दिवशी म्हणून अनिरुद्ध पोर्निमच्या दिवशी मला सद्गुरू श्री अनिरुद्धांकडून मिळालेलं प्रेम मला त्याच्याच चरणी प्रगट करता आल पाहिजे. जसे आपण नदीचे पाणी घेतो आणि नदीलाच अर्पण करतो तसे अनिरुद्धांचे प्रेम घ्यायचे व अनिरुद्धानच अर्पण करायचे, हे आपल्या हातून घडले कि अनिरुद्ध प्रेमाची नित्य उर्जा आपल्याला कधीच कमी पडणार नाही.
अनिरुद्ध प्रेम हीच माझ्यासाठी नित्य वाहणारी व मला शुद्ध करणारी पवित्र तीर्थगंगा आहे. हि तीर्थगंगा श्रद्धावानांकडे प्रवाहित होते ती अशी.

१. जेव्हा आपण सद्गुरू अनिरुद्धांच्या लीलांचे, त्यांच्या गुणांचे संकीर्तन करतो तेव्हा त्यातून नित्यनूतन सद्गुरू प्रेम प्रवाहीत होत असते आणि सद्गुरूंच्या प्रेमाचा स्त्रोत सर्व सामर्थ्याचा स्त्रोत असल्यामुळे जीवन रसमय व तृप्त होते.
२. जेव्हा आपण सद्गुरू श्री अनिरुद्धांचे प्रेमाने नामसंकीर्तन करतो तेव्हा सद्गुरूचे नामस्मरण सद्गुरूंच्या प्रेमाला आपल्या मनात व बुद्धीत स्थिर करते व सद्गुरू भक्ती वाढीस लागते.
३.जेव्हा आपण सद्गुरू श्री अनिरुद्धांचे दर्शन घेतो तेव्हा सद्गुरू आपल्या मनाला बुद्धीशी जोडतो व उचित भक्ती घडून येते.
४. तसेच अनिरुद्ध नामाची, अनिरुद्ध रुपाची आणि अनिरुद्ध गुणसंकीर्तानाची तीर्थगंगा आपल्या जीवनात शुभ, मंगल आणि कल्याणकारी घटना घडवून आणते.
अनिरुद्धांची हि तीर्थगंगा श्रद्धावानांकडे प्रवाहित होते ती अनिरुद्धांच्या महासिद्ध अमृतवाणीतून, त्यांच्या सहजसिद्ध लेखणीतून, त्यांच्या राजीवलोचनातून  व त्यांच्या पावन अशा हस्त व चरणकमलातून ...
श्रद्धावानानो श्री अनिरुद्ध पौर्णिमा हीच आपल्यासाठी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपोर्निमेलाही कोणत्याही भौतिक रूपातील दक्षिणा न स्वीकारणाऱ्या अनिरुद्धाना आपण गुरुदक्षिणा काय देणार? आपण सर्वजन एवढेच सांगूया कि हे सद्गुरू राया अनिरुद्धा, तुझ्या कडून आम्हाकडे सतत वाहणाऱ्या तुझ्या अकारण करुण्याबद्दल आम्ही तुझे सदैव ऋणी आहोत. आम्ही तुझ्या आज्ञेचे पालन करू, तुझे प्रेम हेच आमचे सर्वस्व आहे.
म्हणून श्रद्धावानानो आपल्याला कधीही विस्मरण होऊ नये अशी गोष्ट म्हणजे.....

 
"जाण रे जाण तू या त्रिपुरारीला,  
दाता अनिरुद्ध गायत्री नंदन आला."

|| हरी ओम ||


Source- Shri Gurukshetram Patrika ( Shri Airuddha Gurukshetram)

Friday, July 22, 2011

वाणी

      श्रद्धावानांनो, आपलं जीवन रसमय करण्यासाठी, जीवंत ठेवण्यासाठी, चैतन्यमय ठेवण्यासाठी जीभेचा वापर नीट करूया आणि वाणीचा वापर परमेश्वराच्या नामस्मरणासाठी करून जीवनात परमेश्वराची प्राणप्रतिष्ठा करूया.
 
 वाणी      
      वाणी म्हणजे मी जे बोलतो ते. वाणीचा स्वामी आहे सदगुरू महाविष्णू. मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला तो त्याच्या बुद्धिमत्तेमुळे आणि त्याच्या वाणीमुळे. आम्ही जे बोलतो तीच फक्त वाणी आहे का? नाही, तर आम्ही जे लिहितो ते आणि लिहिलेले बोलतो ती ही वाणीच, मात्र मूळ वाणी त्या परमेश्वराने दिली ती जन्मजात आहे परमेश्वराने दिलेल्या कर्मस्वातंत्र्यामुळे मनुष्य आपल्या मातृभाषेबरोबर अन्य भाषाही शिकतो.
      माझी वाणी मला माझी सिद्धता प्राप्त करून देणारी सगळ्यात मोठ साधन आहे. माझा अभ्यास माझ्या लिहिण्यातून, ऐकण्यातून किंवा बोलण्यातून चालतो. मात्र, ह्याचा वापर कसा करायचा हे माझ्या स्वतः वर अवलंबून असते.
      जीभ जशी बोलते तशी ती रसना पण आहे. माझी जीभ म्हणजे वाक्ज्ञानेन्द्रीय म्हणून ती चव चाखण्याचे काम करते. तर, कर्मेंद्रिय म्हणून ती बोलण्याचे काम करते. त्या वाणीला ऋषींनी ओळखलं.
      वाणी दोन प्रकारच्या तेजांनी बनलेली आहे. ती तेज कुठली? तर, प्राणमय तेज आणि रसमय तेज. म्हणजेच वाणीमध्ये प्राण आहेत व रस ही आहे. आपल्या बोलण्यामध्ये जिवंतपणा असावा लागतो, चैतन्य असाव लागतं. कारण चैतन्य असल्याशिवाय रस उत्पन्न होत नाही आणि रसोत्पत्तीशिवाय जिवंतपणा नाही.
      माझ्या जीभेमध्ये कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्या दोघांचाही मिलाप होतो म्हणून मला वाणीचा वापर नीट करता आला पाहिजे. दुसरयाची निंदा नालस्ती करताना जिवंतपणा असेल पण त्यात रसमयता नाही. कोणाबद्दल बोलायचे असेल तर चांगल्या व्यक्तीबद्दल बोलले पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी वाईट व्यक्तीचे गोडवे गाणे चुकीचे आहे. 
       जीभ हे कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय असल्यामुळे आणि प्राण आणि रस एकत्र असल्यामुळे ती मला परमेश्वराशी जोडणारी वाणी आहे व तेच माझे परमेश्वराशी जोडणारे महत्वाचे साधन आहे. कारण, परमेश्वरही प्राणमय आणि रसमय आहे. मी परमेश्वराला साद घालतो, "देवा धाव!" त्यावेळी मला परमेश्वराशी जोडत कोण? तर वाणी, हे मला नीट ध्यानात ठेवलं पाहिजे.
      नाम घेताना एवढंच ज्ञान असायला पाहिजे कि, मी माझ्या सदगुरूच नाव घेतोय, ते नाम सदगुरूंनी सांगितले आहे. जेव्हा हा भाव मी मनात धरतो तेव्हा, नामातून रसमयता ही प्रवाहित होते.
      राम कृष्ण हरी आणि राम कृष्ण गोविंद ह्यात फरक काय? काहीच नाही. राम कृष्ण हरी म्हणजे कृतीकडून ज्ञानाकडे जाणारा मार्ग. तर, राम कृष्ण गोविंद म्हणजे ज्ञानाकडून कृतीकडे जाणारा मार्ग. ही दोन्ही नाव प्राणमय व रसमय आहेत, पण कशी? तर, जेव्हा मला पूर्ण विश्वास अहिये कि हे नाम माझ्या भगवन्ताच आहे, तेव्हाच. आणि हा विश्वास म्हणजे देवाची प्राणप्रतिष्ठा.
      देवाची  प्राणप्रतिष्ठा कशी करायची? प्राणप्रतिष्ठा, म्हणजे देवाच्या मूर्तीची स्थापना. पण कशी? तर ही केवळ देवाची मूर्ती नसून हा साक्षात माझा देवच आहे असा विश्वास धारण करणे म्हणजे परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा. म्हणजेच देवाचे प्राण अशा पद्धतीने केलेल्या प्राणप्रतिष्ठेमध्ये प्राणमयता आणि रसमयता दोन्ही आहेतच. कारण, हा वाणीचा ईश्वर आहे हा वाकइंद्रियाचा ईश्वर आहे म्हणून तो वाग्मि आहे.
      प्राण आणि रस एकमेकांशी कश्याने बांधले गेले आहेत? यावर शौनक ऋषी उत्तर देतात की, प्राण आणि रस सत्य आणि विश्वास ह्या दोन बंधांनी बांधले गेले आहेत, सत्य आणि विश्वास ह्या दोन गोष्टी परस्पर पूरक असून ह्या वेगळ्या केल्या तर त्या संदर्भहीन होतील.
      परमेश्वर आहे हे सत्य आहे. ते आम्हाला मान्य आहे. पण त्या सत्याचं रुपांतर विश्वासात झाल नाही तर काय उपयोग? म्हणून परमात्म्याने मला जी वाणी दिलेली आहे. ती प्राणमय आणि रसमय आहे. ह्या दोन्हीचा वापर करून मला माझ्या जीवनामध्ये प्रत्येक कृतीत प्राण आणि रस उत्पन्न करायला पाहिजे. 
       भाऊबीजेला भाऊ घरी येणार म्हणून बहिण आपल्या भावाला आवडेल ते पदार्थ करते ही कृती प्राणमय व रसमय आहे. आमची प्रत्येक कृती प्राणमय व रसमयपाहिजे नाहीतर जीवनातली कुठलीही कृती पूर्ण होऊ शकत नाही. जिथे रस आहे तिथे प्राण आहे व जिथे प्राण आहे तिथे रस आहे.
      मी जेव्हा परमेश्वरच्या नामामध्ये तल्लीन होतो तेव्हा माझ्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये ते नाम प्राण उत्पन्न करते आणि रसपण उत्पन्न करते. जिथे गरज आहे तिथे उत्पन्न करते . मात्र, मी भोंदू गोसावाड्याच नाम घेऊन चालणार नाही. सदगुरूच ( परमात्म्याच ) नामाच प्राण व रसमयता निर्माण करू शकते.
      आम्ही आमच्या जीभेचा वापर कसा करायचा? जीभेद्वारे निघणारी वाणी ही वाकवाणी आहे. जिभेची अधिष्टात्री देवता सरस्वती आहे. रसवती म्हणजे रस आणि चैतन्य दोन्ही, आमच जीवन जर आम्हाला रसमय करायचं असेल जीवंत ठेवायचं असेल, चैतन्यमय ठेवायचं असेल तर ह्या जीभेचा वापर नीट करता आला पाहिजे. जीभेचा वापर चांगल बोलण्यासाठी केला पाहिजे. सदगुरूंचे गुणसंकीर्तन करण्यासाठी सदगुरुचे नामसंकीर्तन करण्यासाठी केला पाहिजे. नामस्मरण पूर्ण विश्वासाने प्रेमाने करणे गरजेचे आहे. प्राणप्रतिष्ठा फक्त मूर्तीतच का? ती माझ्या वाणीतही झाली पाहिजे. मग ती जी सरस्वती आहे जिभेची अधिष्टात्री देवता आहे. माझ्या वाणीची उदगाती आहे. ती माझ्या प्रत्येक उचित कृतीला रसपणा आणि चैतन्य देणारच.
      हे सर्व घडून यावे म्हणून माझ्या मनाचा व बुद्धीचा स्वामी असलेला. महाप्राणाचा प्राण असलेला, सर्व रसांचा रसराज असलेल्या व वाणीचा स्वामी असलेल्या सदगुरु श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया की,

"हे अनिरुद्धराया, माझ्या जिभेतुन प्राणमयता व रसमयता निर्माण करणारी वाणीच निघू दे. जी वाणी तुझ्या नामाची, तुझ्या गुणांची व तू घालून दिलेल्या आदर्शांचे आचरण करील."
आधार - सदगुरू श्री अनिरुद्ध प्रवचन.




Source- Shri Gurukshetram Patrika ( Shri Airuddha Gurukshetram)

Thursday, July 14, 2011

श्री गुरुपौर्णिमा उत्सव

     सदगुरू श्री अनिरुद्धा ट्रस्टच्या विद्यमाने
         'श्री हरीगुरुग्राम' न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व येथे १५ जुलै २०११ ऐवजी १६ जुलै २०११ रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार. श्रद्धावानांनो गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी गुरुकृपेचा व गुरुभक्तीचा आनंद लुटुया.
      कलियुगात सद्गुरूचा आधार व गुरुकृपा हीच मानवाच्या प्रपंच व परमार्थाची दोन चाके आहेत. सदगुरुशिवाय माझ्या जीवनात राम नाही व रामराज्यही नाही.

 

       १.  आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो ?
       --  क्षमा, शांती, कारुण्य आणि भक्ती ह्या सर्व गुणांचे अहंकार विरहित ज्ञान समर्थपणे आणि सहजपणे ज्यांनी धारण केले आणि ते सहजज्ञान  संपूर्ण विश्वाला अर्पण केले ते महामुनी म्हणजे भगवान वेदव्यास. भगवान वेदव्यासांनी चारही वेदांचे, उपवेदांचे संपादन केले. पुराने रचली. महाभारत महाभागवताची रचना केली व अखिल विश्वाचे ज्ञान परिपूर्णतेने साकार केले. त्या भगवान वेद्व्यासांचा जन्मदिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. म्हणून ह्या दिवसाला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे संबोधिले जाते व सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.

       २.  मानवाला सदगुरू भक्तीची आवश्यकता का आहे? कारण-----
अ) विश्वातील सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे अखिल विश्वातील चांगल्यातला......चांगल्यातला......चांगल्यातला चांगला (BESTEST) म्हणजे सदगुरू.
ब) मानवाच्या जीवनात सदगुरू आला कि सैतानाला प्रवेश मिळूच शकत नाही.
क)  सदगुरुच्या वारंवार दर्शनाने माझ्या मनातील मानवत्व वाढीस लागते, नामस्मरणाने माझ्या मनातील जनावरे मारली जातात, तर गुणसंकीर्तनाने माझ्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.
ड)  मानवाला प्रपंच व परमार्थ एकचं वेळेस आनंदाने व समर्थपणे करण्यासाठी तसेच स्वतःचा समग्रविकास साधण्यासाठी "ओजाची" आणि "गुरुतेजाची" आवश्यकता असते. सदगुरू तत्वाकडून हे 'गुरुतेज' व 'ओज' प्राप्त होत असते म्हणून प्रत्येक मानवाच्या विकासासाठी सद्गुरू हाच एकमेव आधार आहे.

        ३. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान सदगुरू श्री अनिरुद्धांप्रती आपला भक्तीभाव कसं व्यक्त करतात-----
         --  गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान आपल्या सदगुरूंचे दर्शन घेऊन, पूजन करून, सदगुरू नामसंकीर्तन करून,  सदगुरू ऋणज्ञापक स्तोत्र पठण करून, सदगुरू स्तोत्र, मंत्र पठण करून साजरा करतो. ह्या व्यतिरिक्त सदगुरू श्री अनिरुद्धांच्या भक्तीत असलेले श्रद्धावान खालीलप्रमाणे आनंद लुटतात.----
अ)  सदगुरूंचे पादुका पूजन करून.
ब)  सदगुरू श्री अनिरुद्धांच्या मूर्तीवर अभिषेकासह सदगुरू श्री अनिरुद्धा गायत्री मंत्राचे पठण करून (१०८ वेळा).
क)
 गुरूभावः परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम |
सर्वातीर्थाश्रायाम देवि पाद्न्गुश्ठेच वर्तते ||
ओम ब्राह्मविष्णू महेश्वरेभ्या नमः ||
ह्या श्लोकाचे १०८ वेळा पठण करून.
ड) सदगुरू श्री अनिरुद्धा ऋणज्ञापक स्तोत्राचे पठण करून.
ई)  सदगुरू श्री अनिरुद्धांचे श्री हरीगुरुग्राम येथे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊन व उदिप्रसाद ग्रहण करून.
फ)  रामरक्षा, घोरात्कष्टोद्धरण स्तोत्र, हनुमान चालीसा, आन्हिक ह्या स्तोत्र- मंतांचे वर्षभर पठण करून.
ग)  रामनाम व अन्जानिमाता वही लिहून तसेच, स्वतः कातलेल्या बनविलेल्या लड्या गुरुदक्षिणा म्हणून जमा करून.
ह)  ह्याव्यतिरिक्त श्रद्धावान खालील गोष्टींचे स्मरण करून गुरुभाव व्यक्त करतात व तसे आचरण करण्याचे सदगुरूंना वाचन देतात ते म्हणजे,
            सदगुरू श्री अनिरुद्धांनी मला माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मातृभूमीसाठी जे जे अर्पण करणे उचित आहे ते सगळच्या सगळ आम्हाला शिकविले आहे. श्रीमाद्पुरूषार्थ ग्रंथाराजामधुनही दिले आहे. परंतु मुख्य म्हणजे सदगुरू श्री अनिरुद्धांनी आम्हाला भगवंतावर प्रेम करायला शिकविले आहे, त्याच्या अस्तित्वाचा आनंद लुटायला शिकविले आहे. आणि त्याच्या अस्तित्वाशिवाय सत्य नाही हे ही शिकविले आहे. त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचे प्रत्येक वचन, त्यांची प्रत्येक आज्ञा श्रद्धावानांसाठी त्यांच्या प्रेमाचा अविष्कार आहे म्हणून प्रत्येक श्रद्धावान श्री अनिरुद्धांच्या रामराज्य कार्यात सहभागी होण्याचे वचन देणे ते ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच.

           ४.  सदगुरू श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी ह्या गुरुपौर्णिमेला अपूर्व योग आणला आहे. तो योग म्हणजे-
अ) ह्यावर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून साक्षात नृसिंहसरस्वतींच्या पादुकांचे भक्तांना दर्शन होणार आहे. तसेच, ह्या दिवशी उत्सवाची सुरुवातच मुळी नृसिंहसरस्वतींच्या पादुका पूजनाने होणार आहे व हे पूजन स्वतः परमपूज्य सदगुरू श्री अनिरुद्धा व त्यांच्यासोबत नंदाई व सूचितदादा करणार.
ब) श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवात सिद्ध झालेला पहिला पुर्वावधूत कुंभ व चोविसावा अपुर्वावधूत कुंभ ह्यांना तसेच सदगुरू श्री अनिरुद्धांच्या मूळ सदगुरुंच्या पादुकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळणार आहे.
क) गुरुपौर्णिमा उत्सवात विश्वाचे गुरूतत्वाचे प्रतिक असलेल्या त्रिविक्रमाचे पूजन करण्याची संधी प्रथमच सर्व श्रद्धावानांना मिळणार आहे. 
ड) सदगुरू भक्तीगंगेमध्ये फिरणाऱ्या पालखीमध्ये ठेवलेल्या सदगुरू पदाचीन्हांचे दर्शन तसेच इच्छुक श्रद्धावानांना पद्चीन्हांवर मस्तक ठेवण्यास मिळणार आहे.
          ह्या व्यतिरिक्त रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून बनवलेली इष्टीका मस्तकी धारण करून

भाक्तीस्तंभाला प्रदक्षिणा करावयास मिळेल. त्यावेळी साईराम साईराम | दत्तगुरू सुखधामा | अनिरुद्धा बापू | सदगुरू राया | कृपा करजो देना छाया ||..... साईराम ....साईराम ह्या जपात प्रत्येक श्रद्धावानाला सहभागी होता येते. तसेच अखंड सुरु असलेल्या अग्निहोत्रात 'उद' अर्पण करून स्वतःच्या व आप्तांच्या प्राराब्धनाशासाठी आपल्या प्रत्येकाच्या स्वेछासंकाल्पासाठी प्रार्थना करता येते.

       ५.  अनिरुद्ध भक्तवत्सलदाता गुरुदक्षिणा विषयी काय सांगतात----
 
       --  गुरुपौर्णिमा, अनिरुद्धापौर्णिमा किंवा इतर कधीही भक्ताकडून कोणत्याही स्वरुपात दक्षिणा न स्वीकारणारे अनिरुद्ध आपल्याला सांगतात कि' " माझ्या तेरा कलमी कार्यक्रमासाठी, रामराज्य संकल्पासाठी मला तुमचे श्रम द्या, घाम द्या. स्वतःच्या वाईट प्रारब्धाचा नाश करून मानवजन्म सफल व साकार करण्यासाठी रामरक्षा पाठ म्हणा. तसेच वेळ पडलीच तर भारतमातेच्या संरक्षणासाठी बलिदान द्यायलाही सज्ज रहा. माझ्यासाठी हीच खरी गुरुदक्षिणा आहे.

          सदगुरूंचे दर्शन घेणे सोपे आहे, त्यांच्यासमोर लोटांगण घालणे सोपे आहे. परंतु अनिरुद्धांच्या कार्यात सहभागी होणे हा खरा पुरुषार्थ आहे. म्हणून सदगुरू श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया कि,
"हे भक्तवत्सला अनिरुद्धा, तुझी नित्य कृपा आम्हावर आहेच, पण तुझ्या रामराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला आवश्यक ती बल भक्ती दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. "

|| हरी ओम ||

Source:- Gurukshetram Patrika (Shri Aniruddha Gurukshetram)