Thursday, July 14, 2011

श्री गुरुपौर्णिमा उत्सव

     सदगुरू श्री अनिरुद्धा ट्रस्टच्या विद्यमाने
         'श्री हरीगुरुग्राम' न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व येथे १५ जुलै २०११ ऐवजी १६ जुलै २०११ रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार. श्रद्धावानांनो गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी गुरुकृपेचा व गुरुभक्तीचा आनंद लुटुया.
      कलियुगात सद्गुरूचा आधार व गुरुकृपा हीच मानवाच्या प्रपंच व परमार्थाची दोन चाके आहेत. सदगुरुशिवाय माझ्या जीवनात राम नाही व रामराज्यही नाही.

 

       १.  आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो ?
       --  क्षमा, शांती, कारुण्य आणि भक्ती ह्या सर्व गुणांचे अहंकार विरहित ज्ञान समर्थपणे आणि सहजपणे ज्यांनी धारण केले आणि ते सहजज्ञान  संपूर्ण विश्वाला अर्पण केले ते महामुनी म्हणजे भगवान वेदव्यास. भगवान वेदव्यासांनी चारही वेदांचे, उपवेदांचे संपादन केले. पुराने रचली. महाभारत महाभागवताची रचना केली व अखिल विश्वाचे ज्ञान परिपूर्णतेने साकार केले. त्या भगवान वेद्व्यासांचा जन्मदिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. म्हणून ह्या दिवसाला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे संबोधिले जाते व सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.

       २.  मानवाला सदगुरू भक्तीची आवश्यकता का आहे? कारण-----
अ) विश्वातील सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे अखिल विश्वातील चांगल्यातला......चांगल्यातला......चांगल्यातला चांगला (BESTEST) म्हणजे सदगुरू.
ब) मानवाच्या जीवनात सदगुरू आला कि सैतानाला प्रवेश मिळूच शकत नाही.
क)  सदगुरुच्या वारंवार दर्शनाने माझ्या मनातील मानवत्व वाढीस लागते, नामस्मरणाने माझ्या मनातील जनावरे मारली जातात, तर गुणसंकीर्तनाने माझ्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.
ड)  मानवाला प्रपंच व परमार्थ एकचं वेळेस आनंदाने व समर्थपणे करण्यासाठी तसेच स्वतःचा समग्रविकास साधण्यासाठी "ओजाची" आणि "गुरुतेजाची" आवश्यकता असते. सदगुरू तत्वाकडून हे 'गुरुतेज' व 'ओज' प्राप्त होत असते म्हणून प्रत्येक मानवाच्या विकासासाठी सद्गुरू हाच एकमेव आधार आहे.

        ३. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान सदगुरू श्री अनिरुद्धांप्रती आपला भक्तीभाव कसं व्यक्त करतात-----
         --  गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान आपल्या सदगुरूंचे दर्शन घेऊन, पूजन करून, सदगुरू नामसंकीर्तन करून,  सदगुरू ऋणज्ञापक स्तोत्र पठण करून, सदगुरू स्तोत्र, मंत्र पठण करून साजरा करतो. ह्या व्यतिरिक्त सदगुरू श्री अनिरुद्धांच्या भक्तीत असलेले श्रद्धावान खालीलप्रमाणे आनंद लुटतात.----
अ)  सदगुरूंचे पादुका पूजन करून.
ब)  सदगुरू श्री अनिरुद्धांच्या मूर्तीवर अभिषेकासह सदगुरू श्री अनिरुद्धा गायत्री मंत्राचे पठण करून (१०८ वेळा).
क)
 गुरूभावः परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम |
सर्वातीर्थाश्रायाम देवि पाद्न्गुश्ठेच वर्तते ||
ओम ब्राह्मविष्णू महेश्वरेभ्या नमः ||
ह्या श्लोकाचे १०८ वेळा पठण करून.
ड) सदगुरू श्री अनिरुद्धा ऋणज्ञापक स्तोत्राचे पठण करून.
ई)  सदगुरू श्री अनिरुद्धांचे श्री हरीगुरुग्राम येथे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊन व उदिप्रसाद ग्रहण करून.
फ)  रामरक्षा, घोरात्कष्टोद्धरण स्तोत्र, हनुमान चालीसा, आन्हिक ह्या स्तोत्र- मंतांचे वर्षभर पठण करून.
ग)  रामनाम व अन्जानिमाता वही लिहून तसेच, स्वतः कातलेल्या बनविलेल्या लड्या गुरुदक्षिणा म्हणून जमा करून.
ह)  ह्याव्यतिरिक्त श्रद्धावान खालील गोष्टींचे स्मरण करून गुरुभाव व्यक्त करतात व तसे आचरण करण्याचे सदगुरूंना वाचन देतात ते म्हणजे,
            सदगुरू श्री अनिरुद्धांनी मला माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मातृभूमीसाठी जे जे अर्पण करणे उचित आहे ते सगळच्या सगळ आम्हाला शिकविले आहे. श्रीमाद्पुरूषार्थ ग्रंथाराजामधुनही दिले आहे. परंतु मुख्य म्हणजे सदगुरू श्री अनिरुद्धांनी आम्हाला भगवंतावर प्रेम करायला शिकविले आहे, त्याच्या अस्तित्वाचा आनंद लुटायला शिकविले आहे. आणि त्याच्या अस्तित्वाशिवाय सत्य नाही हे ही शिकविले आहे. त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचे प्रत्येक वचन, त्यांची प्रत्येक आज्ञा श्रद्धावानांसाठी त्यांच्या प्रेमाचा अविष्कार आहे म्हणून प्रत्येक श्रद्धावान श्री अनिरुद्धांच्या रामराज्य कार्यात सहभागी होण्याचे वचन देणे ते ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच.

           ४.  सदगुरू श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी ह्या गुरुपौर्णिमेला अपूर्व योग आणला आहे. तो योग म्हणजे-
अ) ह्यावर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून साक्षात नृसिंहसरस्वतींच्या पादुकांचे भक्तांना दर्शन होणार आहे. तसेच, ह्या दिवशी उत्सवाची सुरुवातच मुळी नृसिंहसरस्वतींच्या पादुका पूजनाने होणार आहे व हे पूजन स्वतः परमपूज्य सदगुरू श्री अनिरुद्धा व त्यांच्यासोबत नंदाई व सूचितदादा करणार.
ब) श्री वरदाचंडिका प्रसन्नोत्सवात सिद्ध झालेला पहिला पुर्वावधूत कुंभ व चोविसावा अपुर्वावधूत कुंभ ह्यांना तसेच सदगुरू श्री अनिरुद्धांच्या मूळ सदगुरुंच्या पादुकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळणार आहे.
क) गुरुपौर्णिमा उत्सवात विश्वाचे गुरूतत्वाचे प्रतिक असलेल्या त्रिविक्रमाचे पूजन करण्याची संधी प्रथमच सर्व श्रद्धावानांना मिळणार आहे. 
ड) सदगुरू भक्तीगंगेमध्ये फिरणाऱ्या पालखीमध्ये ठेवलेल्या सदगुरू पदाचीन्हांचे दर्शन तसेच इच्छुक श्रद्धावानांना पद्चीन्हांवर मस्तक ठेवण्यास मिळणार आहे.
          ह्या व्यतिरिक्त रामनाम वह्यांच्या कागदाच्या लगद्यापासून बनवलेली इष्टीका मस्तकी धारण करून

भाक्तीस्तंभाला प्रदक्षिणा करावयास मिळेल. त्यावेळी साईराम साईराम | दत्तगुरू सुखधामा | अनिरुद्धा बापू | सदगुरू राया | कृपा करजो देना छाया ||..... साईराम ....साईराम ह्या जपात प्रत्येक श्रद्धावानाला सहभागी होता येते. तसेच अखंड सुरु असलेल्या अग्निहोत्रात 'उद' अर्पण करून स्वतःच्या व आप्तांच्या प्राराब्धनाशासाठी आपल्या प्रत्येकाच्या स्वेछासंकाल्पासाठी प्रार्थना करता येते.

       ५.  अनिरुद्ध भक्तवत्सलदाता गुरुदक्षिणा विषयी काय सांगतात----
 
       --  गुरुपौर्णिमा, अनिरुद्धापौर्णिमा किंवा इतर कधीही भक्ताकडून कोणत्याही स्वरुपात दक्षिणा न स्वीकारणारे अनिरुद्ध आपल्याला सांगतात कि' " माझ्या तेरा कलमी कार्यक्रमासाठी, रामराज्य संकल्पासाठी मला तुमचे श्रम द्या, घाम द्या. स्वतःच्या वाईट प्रारब्धाचा नाश करून मानवजन्म सफल व साकार करण्यासाठी रामरक्षा पाठ म्हणा. तसेच वेळ पडलीच तर भारतमातेच्या संरक्षणासाठी बलिदान द्यायलाही सज्ज रहा. माझ्यासाठी हीच खरी गुरुदक्षिणा आहे.

          सदगुरूंचे दर्शन घेणे सोपे आहे, त्यांच्यासमोर लोटांगण घालणे सोपे आहे. परंतु अनिरुद्धांच्या कार्यात सहभागी होणे हा खरा पुरुषार्थ आहे. म्हणून सदगुरू श्री अनिरुद्धांना प्रार्थना करूया कि,
"हे भक्तवत्सला अनिरुद्धा, तुझी नित्य कृपा आम्हावर आहेच, पण तुझ्या रामराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी आम्हाला आवश्यक ती बल भक्ती दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. "

|| हरी ओम ||

Source:- Gurukshetram Patrika (Shri Aniruddha Gurukshetram)

2 comments: